Wednesday, 7 August 2019

मि आणि माझे गाव

मि आणि माझे गाव. 

माझे गाव तसे तांदुळवाडी बुलढाणा जिल्यातील ऐक छोटेसे खेडे पण मी तिथे कधी राहिलोच नाही. माझे गाव होते माझ्या मामाचे गाव राजेगाव जसे नाव तसेच गाव माझा जन्म पण तिथलाच. 
आमचे ३ घर होती म्हणजे मला ३ आजोबा मी त्यांना आजीबाबा बोलायचो आणि आजी ला  आजीमय माझी आई ३ घरात सर्वात मोठी त्यामुळे सर्व घरात मी पण पाहिलंच आणि मोठा नातू त्यामुले माझा एवढा लाड कि विचारून सोय नाही मला २ सखे मामा आणि ३ संख्या मावश्या. आणि चुलत ११ मामे आणि या सर्वांचा मी लाडका.माझ्या मामानं मध्ये ४ मामे माझ्या पेक्षा लहान ४ माझ्याच व्हायचे बाकीचे मोठे होते पण माझे मामा कमी आणि माझे मित्र जास्त होते. गावातले बाकीचे सर्व मग माझे मामा आणि मावश्यच. आमच्या अंगणात २ गोठे  होते एका गोठ्यात गाई बैल म्हशी होत्या आणि एका गोठ्यात बकऱ्या होत्या लहान असताना मला गाई बैलाचा खूपच नाद. कुणाच्या लग्नाची पंगत असली कि जाणून बुजून जास्त जेवण घायचे आणि बैलाला आणून चारायचे घरातल्या टोपलीतले शिळ्या चपात्या भाकरी कुणाला न विचारता चोरून गाईला बैलाला चारायचे. सकाळी उठल्यावर सरावात अगोदर मी गोठ्यात जायचो आणि गाई कडे पाठ करून आणि आणि गाई म्हणजे माय असते ती पण अगदी प्रेमाने माझ्या पाठ चाटायची जणू काही आईच प्रेमाने हात फिरवते असे वाटायचे. बकरीचे दूध काढायला मला खूप स्वादाचे चाटूऊन झाले कि मी लगेच दूध काढायला जायचो  

Friday, 2 August 2019

फौजी, असतात कोण.....??


फौजी, असतात कोण.....??
ती असतात गरीबाची पोरं..
आई-बाप मजुरी करतात, शेती करतात, त्यांना वेळेला पैसे मिळत नाय,त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास फिस साठी पैसे नसतात,त्यांच्या पायाला बुट नसतो,कमी वयात त्यांना जबाबदारी सतावते,भरतीला जायला पैसे नसतात,भरतीला जाताना आई-बाप म्हणतात, लेकरा यावेळी तरी भरती होशील ना रे तू..जरा जीव लावून प्रयत्न कर..आणि त्यांनी मजुरी करून साठवलेले पैसे ते देतात भरतीला जाण्यासाठी,भरतीला गेल्यावर फुटपाथवर झोपावं लागत, खूप त्रास सहन करावा लागतो, एवढे करून पण कधी अपयश आल्यावर किती वाईट वाटतं..मग हीच पोरं एकांतात जाऊन ढसाढसा रडतात, तेव्हा त्यांना समजवायला पण जवळ कोणी आपलं नसतं..!!

गरीबी-


जशी ट्रेन सुरु झाली,
एक बाई आणि तिचा पती एक लोखंडी पेटी घेऊन घाईघाईने गाडीत चढले.
     बाई तर दरवाजाजवळच बसली पण माणूस चिंतातुर उभा होता. त्याला माहित होते की त्यांच्या जवळ जनरल डब्याचे तिकीट आहे आणि हा रिज़र्वेशनचा डब्बा आहे. टीसी ला तिकीट दाखवत त्याने हात जोडले.
      "हे जनरलचे तिकीट आहे. पुढच्या स्टेशन वर जनरल डब्ब्यात जाऊन बसा, नाहीतर आठशे ची पावती बनेल." असे बोलून
टीसी पुढे निघून गेला.
     पति-पत्नी दोघे मुलीला  पहिला मुलगा झाला म्हणून त्याला बघायला चालले होते. शेठनी मोठ्या मुश्किलीने दोन दिवसांची सुट्टी आणि सातशे रुपये एडवांस दिले होते.
      पत्नी व लोखंडी पेटी घेऊन जनरल डब्यात प्रयत्न केला पण घुसू शकले नाही. लाचार होऊन स्लिपर क्लास मध्ये आले होते.
     "साहेब, पत्नी व सामान घेऊन जनरल डब्यात चढ़ू नाही शकलो. आम्ही येथेच कोपऱ्यात उभे राहू. खूप मेहरबानी होईल." टीसी ला शंभर रुपयांची नोट देत म्हणाला.
     "शंभर मध्ये काही होत नाही. आठशे काढ नाहीतर उतरून जा."
     "आठशे तर गुड्डीच्या बाळंतपणाला ही लागले नाही साहेब. नातूला बघायला चाललो आहोत. गरीब लोकं आहोत, जाऊ द्या ना साहेब." यावेळी पत्नी ने म्हटले
      "मग असं करा, चारशे काढा. एकाची पावती बनवून देतो, दोघे बसून रहा."
     "हे घ्या साहेब, पावती राहू द्या." दोनशे रुपये देत माणूस बोलला.
      "नाही-नाही पावती तर बनवावीच लागेल. वरूनच हुकूम आहे. पावती तर बनेलच. चला, लवकर चारशे काढा, नाहीतर स्टेशन येत आहे, उतरून जनरल डब्यात निघून जा." टी सी यावेळी काहिसे रागावून बोलला.
     माणसाने चारशे रुपये असे दिले जसे काळीज काढून देत आहे.
     दोघे पति-पत्नी उदास, रडवेले होऊन असे बसले होते, जसे नातू चा जन्म झाल्यामुळे नाही तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी चालले आहेत.
      कसे अॅडजस्ट करतील हे चारशे रुपये? परतीच्या तिकिटासाठी व्याह्यांकडून पैसे मागावे लागतील का?
नाही-नाही.
      शेवटी पति बोलला- "शंभर- दिडशे तर मी जास्तच आणले होते. गुड्डी च्या घरी पायीच जाऊ. सायंकाळी जेवायचं नाही. दोनशे तर अॅडजस्ट होऊन जातील. आणि हा, येतांना पॅसेंजर ने येऊ. शंभर रूपये वाचतील.  एक दिवस जरूर जास्त  लागेल. शेठ पण ओरडेल. पण मुन्ना साठी सर्व सहन करुन घेईन. पण तरीही हे तिनशेच झाले."
    पत्नी म्हणाली, "असे करुया, बाळाच्या हातात आजी-आजोबांकडून जे शंभर-शंभर देणार होतो ना, आता दोघे मिळून शंभरच देऊ. आपण वेगळे थोडेच आहोत. झाले ना चारशे अॅडजस्ट."
      "पण बाळाला द्यायचे कमी करने...." आणि पतिच्या डोळ्यात पाणी आले.
     "मन कशाला जड करता वो, गुड्डी जेव्हा बाळाला घेऊन घरी येईल, तेव्हा दोनशे जास्त देउन देऊ." असं म्हणताना तिचेही डोळे भरून वाहू लागले.
    मग डोळे पुसत म्हणाली- "जर मला कुठे मोदीजी भेटले तर सांगेन- "इतक्या पैशांची बुलेट ट्रेन चालवण्या पेक्षा इतक्या पैशांनी प्रत्येक ट्रेन मध्ये चार-चार जनरल डब्बे लावून द्या, ज्यामुळे आपल्या सारख्यांना तिकीट असूनही बेइज्जत व्हावे लागणार नाही व बाळाच्या हातात द्यायचे शंभर रुपये ही कमी होणार नाहीत." तिचे डोळे परत वाहू लागले.
      "अगं वेडे, आपण गरीब माणसं आहोत, आम्हाला मतदान करण्याचा तर अधिकार आहे, पण सल्ला देण्याचा नाही. रडू नको.
(एक नम्र विनंती आहे, ज्याची ही कथा वाचून झाली त्याचे या घटनेशी काही घेणे नसले तरी ही कहानी शेयर करा, कॉपी पेस्ट करा पण संबंधित व्यक्तींपर्यंत ही पोहोचू द्या जेणेकरून रेल्वे मंत्रालय जनरल डब्यांचीही परिस्थिती समजू शकेल ज्यात प्रवास करणारा एक गरीब वर्ग ज्याचे अनंतकाळापासून शोषण होत आले आहे.
   

बचत

 माझ्या प्रिय मित्रानो आज मी तुम्हाला आपाल्याच पैशाबद्दल काहीतरी सांगणार आहे बघा पटतंय का
१. आपण जो महिन्याभरात पैसे कमवतो तो .
२. आपला महिन्याभाराचा खर्च  तो.
३. आपल्या पैशाची बचत
४. ?
 
मित्रानो आटा बघा आपण महिनाभर काम करतो आणि महिन्या आखेर आपल्याला एक पगार भेटतो त्या नंतर त्या मध्ये येतो तुमचा महिन्या भाराचा खर्च जो ठरलेला आहे. म्हणजे तुमचे light bill, watar bill , मुलांची school fees , class fees , तुमचे महिन्याचे राशन, गॅस , आणि औषध वैगेरे अजून खुपसारा  खर्च आणि हा सर्व आपल्या पगारातून करायचा आहे. आणि नंतर यामधून आपल्याला बचत पण करायची आहे. काय वाटते बचत होते का.

आणि समाजा आपला महिन्याला मिळणारा पगार काही कारणास्तव बंद झाला किंवा घरातला कर्ता वेक्तीच आपल्यातून निघून गेला तर काय ? परिवाराला जो खर्च लागतोय तो तर लागणारच आहे मग तेव्हा काय कार्याचे पैसा असो किंवा नसो मग तेंव्हा काय कार्याचे? मग पुढचा option आहे आपली बचत पण आपल्याकडे एवढी बचत आहे का ?

मि.....

मि सुरेश अर्जुन जाधव वडीलांचे नाव अर्जुन विठोबा जाधव रहाणार भांडुप हनुमान नगर मुंबई . आम्ही मूळचे विदर्भातले मातोश्री जिजाबाईच्या जिल्ह्यातले म्हणजे बुलढाना तालुका सिंदखेडराजा गाव तांदुळवाडी. आमच्या घरी माझे आई, बाबा, काका, काकू, माझी चुलत भाहीन, आणि आजी असा आमचा परिवार. घरी खूप खूप म्हणजे खूपच गरिबी. घरी शेती नाही कोणती नोकरी नाही रोज आपले मजुरी करून खायचे. आज्जी आणि माझी बहीण सोडून सर्वजण कामावर जायचे खणते खणायला. बायकांचे तर माणसापेक्षा कि खराब काम होते. सकाळीच ४ वाजता उठा जात्यावर दळणं दळा २ किलोमीटर विहिरीवरून पाणी आणा न्याहारी बनवून ७ वाजता. नवऱ्या बरोबर खणते खणायला जा . आणि परत संध्या काळी सेम तेच जात्यावर दळण दळा २ किलोमीटर पिण्यासाठी पाणी आणा.